नितेश राणेंचं रेट कार्ड? काँग्रेसच्या नेत्याने स्क्रीनशॉट शेअर करत केला पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची एन्ट्री झाल्यावर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी ती यात्रा बंद करा. यात्रा रोखा, अशी मागणी केली होती. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींच्या सभेजवळ जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला… त्यातच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेते, अभिनेत्री इतर मंडळींचीही चर्चा होऊ लागली… त्यानंतर विरोधकांकडून आरोप करण्यात आला की ही यात्रा मॅनेज केलेलं आहे.

ADVERTISEMENT

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं होतं की, भारत जोडो यात्रेत कलाकारांनी यावं, सहभागी यावं म्हणून पैसे दिले जातात असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनंही नितेश राणेंवर पलटवार केलाय.

नितेश राणेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं वाचा…

“राहुल गांधींच्या यात्रेचं स्टेज मॅनेज केलं जातंय. हा घ्या पुरावा, भारत जोडो यात्रेत येण्यासाठी आणि फिरण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात याचा हा पुरावा आहे. सब गोलमाल है भाई! ये पप्पू कभी पास नहीं होगा!!”, असं म्हणत नितेश राणेंनी एक स्क्रिनशॉट शेअर केला होता.

हे वाचलं का?

“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधींसोबत 15 मिनिटं चालण्यासाठी अॅक्टरची गरज आहे. अॅक्टरच्या प्रवास आणि राहण्याची सोय आपल्याकडून केली जाईल. प्लिज नोट. यात्रेदरम्यान अॅक्टर आपल्या सोयीनुसार त्याची वेळ निवडू शकतो. फक्त नोव्हेंबर महिन्यासाठीची ही रिक्वायरमेंट आहे. पाहुण्यांच्या १५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी सर्वोत्तम मानधन दिलं जाईल”, असं या स्क्रीनशॉटमधील मेसेजमध्ये आहे.

नितेश राणेंनी शेअर केलेला स्क्रिनशॉट हा व्हॉट्सअॅपवर कुणीतरी फॉरवर्ड केल्याचं दिसतंय. मेसेजच्या वेळेनुसार हा संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी आलेला मॅसेज आहे, मात्र याच कुठेही तारीख दिसत नाही.

ADVERTISEMENT

या पोस्टवरून नितेश राणेंना ट्रोलही केलं जातंय. त्याला आता काँग्रेसच्या नेत्यांनीही उत्तर दिलंय. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे समन्वयक गौरव पांधींनी ट्विट करत उत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

पांधींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमधील मजकूर असा…

नितेश राणेंचे रेटकार्ड… तुम्हाला जर नितेश राणेंना कार्यक्रमाला बोलवायचं असेल, तर खालीलप्रमाणे रेट आहेत.

किटी पार्टी – 600 रुपये

वाढदिवस पार्टी – 600 रुपये

शौचालय स्वच्छता – 150 रुपये

छत साफसफाई – 200 रुपये

राजकीय कार्यक्रम – 1300 रुपये (यामध्ये 50 कार्यकर्ते)

तुम्ही एकदा बोलवलं ते तुमची आज्ञाधारक सेवकाप्रमाणे सेवा करतील

कृपया तुमची आवश्यकता सांगा.

हा स्क्रीनशॉट शेअर करताना पांधींनी निलेश राणेंना टॅग करत विचारलंय की हे खरं आहे का? खूपच वाईट हाल सुरू आहेत. मलाही हा स्क्रीनशॉट आलाय, असं म्हणत पांधींनी नितेश राणेंना टोला लगावलाय.

यातच आता सचिन सावंतांनीही एक ट्विट केलंय. त्याचं म्हणणं आहे की, “भारत जोडो यात्रेला बदनाम करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पुरावे म्हणून बोगस व्हॉट्सअॅपचे फोटो दाखवले जात आहेत. ज्यामध्ये नाव नाही, नंबर नाही.”

भारत जोडो यात्रेतल्या कलाकारांच्या सहभागाच्या रेड कार्डवरून सुरू झालेला राजकीय वाद आता वाढत जाण्याचीच चिन्हं दिसत आहेत. काँग्रेस नेत्याकडून करण्यात आलेल्या टीकेला आता नितेश राणे काय उत्तर देणार हेही महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT