Nitin Desai आत्महत्या आणि रशेष शाह कनेक्शन; आशिष शेलारांचे 4 स्फोटक सवाल
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. कर्ज प्रकरणात फसवणूक आणि छळवणूक होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहेत. यावरून आता आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT

Nitin Desai Death Reason : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जत-खालापूर येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, पण त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या काही रेकॉर्डिंगने खळबळ उडालेली असतानाच आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत. शेलार यांनी रशेष शाह यांचा उल्लेख करत नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
“कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूची सरकार चौकशी करणार, तेव्हा रशेष शाह यांचा बोलविता “धनी” कोण? याही मुद्यांची चौकशी करण्यात यावी”, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. “एका मराठी माणसाने मोठ्या धाडसाने बाजारात उपलब्ध असलेल्या सुविधेतून कायदेशीर प्रक्रिया करुन कर्ज घेतले, पण योग्य कायद्याचा गैरवापर करुन नितीन देसाई यांना अडचणीत आणण्यात आले का?”, अशी शंका शेलारांनी उपस्थित केली आहे.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर शेलारांनी काय म्हटलंय?
आशिष शेलार म्हणाले की, “रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीचा ज्या पद्धतीचा रेकॉर्ड आ,हे त्याची कालपर्यंत आपल्याकडे दोन प्रकरणे आली होती. आता अजून काही प्रकरणे येऊ लागली आहेत. आता या कंपनीची चार प्रकरणे आपल्याकडे आली आहेत. त्यामध्ये या कंपनीने योग्य कायद्याचा अयोग्य वापर करुन खासगी सावकारी थाटली आहे. त्यामुळे या प्रकरणात रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीचा हेतू काय होता?”, असा सवाल शेलारांनी केला आहे.
वाचा >> Nitin Desai : …अन् नितीन देसाईंच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला झाली सुरूवात
“एका मराठी माणसाने उभा केलेला स्टुडिओ व त्याचा उद्योग गिळंकृत करण्याचा हेतू होता का? याची चौकशी करण्यात यावी; हा एनडी स्टुडिओ रशेष शाहांकडून अन्य कोणी विकत घेणार होतं का? त्या ग्राहकाच्या सांगण्यावरुनच नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता का?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.