फक्त मोदींच्या नावावर मतं मिळतील याची खात्री नाही; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा असून, मोदींकडे बघून लोक मतं देतात, असं विविध नेते बोलत असतात. मात्र, आता चक्क भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांने नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मिळतील, याची शाश्वती नसल्याचं म्हटलं आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत हे विधान केलं आहे. या बैठकीचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात ते बोलताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

‘एनडीटीव्ही’नं हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय नियोजन आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हे विधान केलं आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात राव इंद्रजित सिंह बोलताना दिसत आहेत.

‘नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आपल्यावर आहेतच. आपल्या राज्यावरही आहेत, पण फक्त त्यांच्या नावावर आपल्याला मतं मिळतील हे खात्रीने सांगता येत नाही. मतदारांनी मोदींच्या नावावर आपल्याला मतदान करावं, असाच आपला उद्देश आहे. पण हे स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवरही अवलंबून आहे. मतं दिली जात आहेत, याची खात्री त्यांनी करायला हवी’, राव इंद्रजित सिंह पदाधिकाऱ्यांना म्हणत आहेत.

हे वाचलं का?

यावेळी राव इंद्रजित सिंह यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीचाही हवाला दिला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपण केंद्रात सत्ता स्थापन करू शकलो हे आपल्याला मान्यच आहे. त्याचा परिणाम राज्यांवरही दिसून आला. हरयाणामध्ये पहिल्यांदा सरकार बनवू शकलो. दुसऱ्यांदाही सरकार बनवलं. परंतु सर्वसाधारणपणे असं होतं की, दुसऱ्यांदा दुसऱ्या पक्षाला संधी मिळते’, राव इंद्रजित सिंह यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना नमूद केलं.

गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी मोदी-शाहांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’

ADVERTISEMENT

90 जागा असलेल्या हरयाणा विधानसभेत भाजपचे पहिल्या वेळी 47 आमदार निवडून आले. त्यानंतर दुसऱ्यांदा 40 आमदार निवडून आले. अशा निकालात विजयाचं अंतर कमी होणं साहजिक आहे. पण आता त्या 45 जागा आपण पुन्हा जिंकू शकतो का? याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल’, असं राव इंद्रजित सिंह यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT