मोठी बातमी : प्रविण दरेकरांना हायकोर्टाकडून धक्का, मजूर प्रकरणातील याचिका फेटाळली
मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात कठोर कारवाई होऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. प्रविण दरेकर यांना आशा होती की, संबंधित प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा […]
ADVERTISEMENT

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात कठोर कारवाई होऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. प्रविण दरेकर यांना आशा होती की, संबंधित प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा मिळू शकतो. मात्र, कोर्टाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावली. पण यावेळी कोर्टाने असंही स्पष्ट केलं आहे की, आपण यासंदर्भात योग्य कोर्टात जावं. यासाठी योग्य कोर्ट म्हणजे सत्र न्यायालय आहे.
हायकोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे आता प्रविण दरेकर यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जावं लागणार आहे. जर सत्र न्यायालयाने या प्रकरणात त्यांना जामीन नाकारला तर ते पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेऊ शकतात.
कोर्टात काय घडलं?
दरेकर यांनी त्यांच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावर कठोर कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशा आशयाची याचिका दरेकर यांनी केली होती.










