मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड
मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाही तर खिशाला मोठा भुर्दंड पडणार हे विसरू नका. विमानतळावर जाऊन तुम्ही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणार नसाल तर थेट १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने बेड मिळवण्यासाठी वणवण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने प्रवाशांना यासंदर्भातली ताकीदच दिली आहे. जे प्रवासी कोरोना प्रतिबंधाचे नियम जसे […]
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाही तर खिशाला मोठा भुर्दंड पडणार हे विसरू नका. विमानतळावर जाऊन तुम्ही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणार नसाल तर थेट १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने बेड मिळवण्यासाठी वणवण
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने प्रवाशांना यासंदर्भातली ताकीदच दिली आहे. जे प्रवासी कोरोना प्रतिबंधाचे नियम जसे की मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझरचा वापर हे सगळं करणार नाहीत त्यांना थेट १ हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई विमानतळावर मार्शल्सही नेमण्यात आले आहेत अशी माहिती मुंबई विमानतळाच्या एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे प्रवासी नियम पाळणार नाही त्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागेल. जे प्रवासी सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत किंवा मास्क घालणार नाहीत किंवा या नियमांचा भंग करतील त्या सगळ्यांना १ हजार रूपये दंड भरावा लागेल असंही विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात Corona चा कहर सुरुच, दिवसभरात ४९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम कसे पाळायचे यासंदर्भातली एक नियमावली ही मे २०२० या महिन्यातच तयार करण्यात आली आहे. तसेच CSMIA नेही यासंदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. प्रवास करत असताना, एअरपोर्टचा वापर करत असताना काय काय नियम पाळले पाहिजेत जेणेकरून कोरोनाचा प्रतिबंध होईल त्याची घोषणाही करण्यात येत असते. तरीही जे प्रवासी नियम मोडतील त्यांच्याकडून १ हजार रूपयांचा दंड वसूल केला जाईल.
ADVERTISEMENT
मागील नियमावली तसेच सध्या DGCA कडून आलेल्या नियमावलीनुसार जे प्रवासी नियम मोडतील, कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करणार नाही त्यांना दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागेल. प्रवासी काटेकोरपणे नियम पाळत आहेत की नाहीत यावर एअरपोर्टवर नियुक्त करण्यात आलेल्या मार्शल्सची नजर असणार आहे.
प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश करण्याच्याआधी त्यांचं टेम्प्रेचर पाहिलं जाईल. तसंच सॅनेटायझशनची प्रक्रियाही पार पडेल. जे महत्त्वाचे टच पॉईंटस आहेत तिथे हे अधिक काटेकोरपणे केलं जाईल. एअरपोर्टवर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी विविध प्रकारचे फ्लोअर मार्किंग, आसनव्यवस्थेसाठीची सूचना हे सगळं देण्यात आलं आहे. तसंच एअरपोर्टवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हँड सॅनेटायझरही ठेवण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना संपर्क न करता पैसे भरता येऊन तिकिट मिळू शकेल, बोर्डिंग पास मिळू शकेल अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही कुणी प्रवासी नियम पाळत नसतील किंवा नियम मोडत आहेत असं दिसून आल्यास थेट १ हजार रूपये दंड वसूल केला जाईल असंही एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT