आता हे सूत्र तरी कायम ठेवा! म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिला ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. अँटेलिया प्रकरणातला सचिन वाझेंचा सहभाग. मनसुख हिरेन यांची हत्या, त्यावरून झालेले आरोप. त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेला लेटरबॉम्ब. तसंच रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून पोलीस बदल्यांचं रॅकेट उघड करत सरकारवर झाडलेल्या आरोपांच्या फैरी.. हे सगळं असलं तरी आता कोरोनाचं टेस्टिंग ठाकरे सरकारने वाढवलं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सल्लाही दिला आहे.

अधिवेशन गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोष्ट!

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चाचण्या वाढवणं हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या एक लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट बघावी लागली.

गेल्या काही दिवसात सरासरी १ लाख २६ हजार ९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता हे सूत्र तरी कायम ठेवा. येणाऱ्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही तर टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे.

ADVERTISEMENT

Corona रूग्ण वाढल्याने होळीचे रंग उधळू नका, राज्य सरकारच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटव्ह कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर टेस्टिंग वाढवणं गरजेचं होतं. त्या इतके दिवस होत नव्हत्या मात्र आता होऊ लागल्या आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला किमान हे सूत्र तरी पाळा असं म्हणत सल्ला दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT