Crime: एक-एक करून सात बाळांची हत्या, हॉस्पिटलची नर्सचं चिमुकल्यांच्या जीवावर का उठली?
उत्तर इंग्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रसिद्ध रूग्णालयात एक नर्स नवजात बालकांच्या देखरेखीसाठी ड्यूटीवर होती. ही नर्स ड्यूटीवर असताना तब्बल सात बाळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
ADVERTISEMENT
उत्तर इंग्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रसिद्ध रूग्णालयात एक नर्स नवजात बालकांच्या देखरेखीसाठी ड्यूटीवर होती. ही नर्स ड्यूटीवर असताना तब्बल सात बाळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेवर सुरूवातीला नर्सवर कोणालाच संशय आला नाही. पण नंतर जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा रूग्णालय प्रशासन पासून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. कारण जी नर्स बाळांची देखरेख करत होती, तीच एक-एक करून अघोरी उपायाने बाळाची हत्या करत असल्याचे उघडकीस आले होते. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे. नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, तो जाणून घेऊयात. (nurse killing 7 babies in uk hospital indian origin doctor help court to accuse arrest)
ADVERTISEMENT
उत्तर इंग्लंडमधील चेस्टर येथील काउंटीज ऑफ चेस्टर या रूग्णालयात ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या रूग्णालयात लूसी लेटबी (33) वर्षीय महिला लहान मुलांच्या व़ॉर्डमध्ये कामाला होती. या वॉर्डमध्ये ती लहान मुलांची देखरेख करायची. साधारण वर्षभर ती या रूग्णालयात कामाला होती. लुसी रूग्णालयात काम करत असताना वर्षभराच्या कालावधीत एका मागून एक बाळांचा मृत्यू होत होता. हे मृत्यू देखील संशयास्पद होते.
हे ही वाचा : Crime: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, तरूणाने स्क्रू डायव्हरने…लिव्ह इन पार्टनरसोबत भयंकर कृत्य
हॉस्पिटलमधील भारतीय वंशाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. रवी जयराम यांना या बाळांच्या मृत्यू प्रकरणात नर्स लुसीवर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी रूग्णालय प्रशासनाला सावध केले आणि पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी लुसी लेटबीवर देखरेख करायला सुरवात केली. यावेळी तिच्यावर संशय आल्यावर पोलिसांनी तिला अटक केली होती. या अटकेनंतर तिची चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल करून धक्कादायक माहिती दिली.
हे वाचलं का?
लुसीने रूग्णालयात जन्मलेल्या सात नवजात बालकांची हत्या केली होती. या बाळांच्या रक्तात इंजेक्सनद्वारे हवा सोडणे, इन्सुलिन सोडणे, अन्ननलिका मार्गात हवा सोडणे,दूध किंवा द्रवपदार्थाचा मारा करणे, असे अघोरी उपाय करून तिने बाळांची हत्या केली होती. या सात बालकांसह अन्य सहा बालकांची ती हत्या करण्याच्या तयारीत होती, मात्र तिथपर्यत तिला अटक झाली होती.
लुसीच्या या कृत्याबद्दल आता मॅचेस्टर क्राऊन न्यायालयाच्या न्यायाधिशांनी तिला दोषी ठरवले आहे. लुसीवरील दोष सिद्ध होण्यासाठी डॉ. रवी जयराम यांनी न्यायालयाला मदत केली. आता या हत्या प्रकरणात उद्या सोमवारी न्यायालय तिला शिक्षा ठोठावणार आहे. या घटनेने सध्या उत्तर इंग्लंड हादरलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : loco pilot suicide : … आणि लोको पायलटने आयुष्यच संपवलं, कल्याणमधील घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT