OBC Reservation : बारामतीत 29 जुलैला होणाऱ्या एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती – येत्या 29 जुलै रोजी बारामती येथे ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी एल्गार महामोर्चा होणार आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण या मोर्चाने ढवळून निघाले असताना आता मात्र बारामती पोलिसांनी कोरोनाचे कारण सांगत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा महामोर्चा होणार का याकडे ओबीसी बांधवांचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी 29 जुलै रोजी बारामती येथे सर्वच ओबीसी बांधवांनी एकत्र येत एल्गार महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालू आहे. या मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे पालवे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. बारामतीतील ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत यांना मोर्चाला उपस्थित राहण्याबाबत आमंत्रणही दिले होते. त्यांनीही सदर मोर्चाला उपस्थित राहण्याबद्दल अनुकुलता दर्शवली होती. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात शिष्टमंडळाने गावोगावी भेट देत चोख नियोजन केले आहे. मात्र मोर्चा आठ दिवसांवर आला असताना बारामती पोलिसांनी एक नोटीस काढत सदर मोर्चाला परवानगी नाकारली आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची असून पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे .

मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोलिसांनी मोर्चेक-यांना मोर्चा काढण्यात ऐवजी आपले म्हणणे कायदेशीर मार्गाने मांडण्याचा सल्ला देत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तशा प्रकारची नोटीस बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जारी केली आहे. त्यामुळे या हा एल्गार महामोर्चा होणार का? पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असताना या मोर्चाला मंत्री उपस्थित राहणार का? ओबीसी बांधव या नोटीस विरोधात काय भूमिका घेणार याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT