Omicron Death: भारतात पहिला ओमिक्रॉन रुग्ण दगावला, पिंपरी-चिंचवडमध्ये 52 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवड: कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियाहून परतलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा 28 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड, पुणे येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाला 13 वर्षांपासून मधुमेहाचा देखील त्रास होता. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या मृत्यूचे कारण नॉन-कोविड असल्याचे नोंदवले गेले होते. मात्र, NIV अहवालात ही व्यक्ती Omicron संक्रमित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता Omicron व्हेरिएंटने देखील धास्ती वाढवली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आतापर्यंत 450 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे

गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा बुधवारच्या तुलनेत 1,468 ने अधिक आहे. या दरम्यान 1,193 संक्रमित बरे झाले आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासात राज्यात 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

सध्या राज्यात 18,217 बाधितांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय येथे ओमिक्रॉनचे 198 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात आढळलेल्या 198 ओमिक्रॉन बाधितांपैकी 190 रुग्ण हे फक्त एकट्या मुंबईत सापडले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 961 रुग्ण

ADVERTISEMENT

आतापर्यंत, Omicron व्हेरिएंट देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. गुरुवारी ओडिशात पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 961 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ओमिक्रॉनची लागण झालेले 320 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने, लग्न-कार्यक्रमांसाठी फक्त 50 जणांनाच परवानगी; पाहा काय आहेत नवे निर्बंध

जगात आतापर्यंत 59 ओमिक्रॉन रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा जगातील 121 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत जगभरात ओमिक्रॉनचे 3 लाख 30 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

याशिवाय जगात आतापर्यंत एकूण 59 ओमिक्रॉन संसर्गग्रस्तांनी आपला जीव गमावला आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण हा प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ज्यानंतर जगभरात त्याचा फैलाव झाल्याचं आता दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT