PM मोदी लोकसभेत फक्त काँग्रेसवरच बरसले, पण अदाणींवर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Prime minister Narendra Modi Speech : पंतप्रधान (Narendra Modi) मोदी संसदेत (Assembly) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण दिले. लोकसभेत पीएम मोदी म्हणाले, ‘काल मी पाहत होतो की काही लोकांच्या भाषणाने संपूर्ण इकोसिस्टीम उसळत होती.’ पंतप्रधान म्हणाले, विरोधकांची द्वेषाची भावना बाहेर आली आहे. पीएम मोदी म्हणाले, देशातील काही लोक निराशेत बुडाले आहेत, त्यांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही. मात्र संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी केवळ आणि केवळ काँग्रेसला टार्गेट केलं. त्यांनी अदाणींबाबत एकही शब्द यावेळी उच्चारला नाही. Prime Minister Narendra Modi Targeted On Congress

ADVERTISEMENT

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशाच्या उपलब्धी तर मोजल्याच, पण विरोधकांवरही निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मकता, आशा, विश्वास आहे. आज भारताला G20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही आनंदाची बाब आहे. ही देशासाठी आणि 140 कोटी देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, परंतु मला वाटते की काही लोक यामुळे दुःखी असतील. ते कोण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

निराशावादी लोक या देशाची प्रगती स्वीकारण्यास तयार नाहीत
भारतात नवीन शक्यता असल्याचे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितले. अनेकांना हे समजायला थोडा वेळ लागेल, पण पुरवठा साखळीच्या बाबतीत भारत पुढे गेला आहे. भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. भारताच्या समृद्धीत जगाला त्याची भरभराट दिसत आहे. निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. 140 कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना पाहवत नाही.

हे वाचलं का?

‘स्टार्टअपमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे’
पंतप्रधान म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत भारतात 90 हजार स्टार्टअप आले आहेत. आज आपण स्टार्टअप्सच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशातील टियर-3 शहरांमध्ये मोठी स्टार्टअप इकोसिस्टम पोहोचली आहे. इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात 108 युनिकॉर्न तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे त्याची किंमत सहा-सात हजार कोटींहून अधिक आहे. आज भारत मोबाईल बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

यूपीए सरकारवर जोरदार निशाणा साधला
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी यूपीए सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काँग्रेस सरकारचा काळ म्हणजे घोटाळ्यांचे दशक असे वर्णन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004 ते 2014 हे वर्ष स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक घोटाळ्यांचे दशक होते. त्याच वेळी, 10 वर्षे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले सुरूच होते. काश्मीरपासून ईशान्येपर्यंत 10 वर्षांत केवळ हिंसाचार. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज इतका कमकुवत होता की जग ऐकायला तयार नव्हते.

ADVERTISEMENT

त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे आज जेव्हा देशातील 140 कोटी जनतेची क्षमता फुलत आहे. 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी ती संधी गमावली आणि प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले. यावेळी पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर घोटाळा, कोळसा घोटाळा, दहशतवादी हल्ला, महागाई दोन अंकी मुद्द्यांवरून यूपीए सरकारला घेरले. पीएम मोदी म्हणाले, 2014 पूर्वी हरवलेले दशक होते, परंतु 2030 पर्यंत ते भारताचे दशक असेल.

ADVERTISEMENT

घोटाळ्यांमुळे देशाची जगात बदनामी झाली – पंतप्रधान
पंतप्रधान मोदींनी यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा अणुकरारावर चर्चा होत होती तेव्हा ते नोट फॉर व्होटमध्ये गुंतले होते, असे ते म्हणाले. पीएम मोदींनी टूजी, कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख केला आणि घोटाळ्यांमुळे देशाची जगात बदनामी झाली. ते म्हणाले की, 2004 ते 2014 या दशकात देशाचे खूप नुकसान झाले. 2030 हे दशक भारताचे आहे. दहशतवादाविरुद्ध प्रत्युत्तर देण्याचे धाडस त्यांच्यात नव्हतं. 10 वर्षे देशातील नागरिकांचे रक्त सांडले, असं मोदी म्हणाले.

आरोपांमध्ये विरोधकांनी 9 वर्षे वाया घालवली – पंतप्रधान मोदी
विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या शिरपेचात आहे. टीका व्हायला हवी पण आरोपात त्यांनी नऊ वर्षे वाया घालवली. निवडणूक हरली तर ईव्हीएमला दोष द्या, भ्रष्टाचाराची चौकशी झाली तर एजन्सींना शिव्या. ते म्हणाले की ईडीने या लोकांना एका व्यासपीठावर आणले याबद्दल ईडीचे आभार मानले पाहिजेत.

‘प्रत्येकजण आपापल्या समजुतीनुसार बोलला’
राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा अभिमान वाढवला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांच्या भाषणात संकल्प ते सिद्धी अशी ब्ल्यू प्रिंट काढण्यात आली आहे. त्यांच्या भाषणानेही एक प्रकारे देशाला प्रेरणा दिली. येथे सर्वांनी या चर्चेत भाग घेतला. प्रत्येकजण आपापल्या प्रवृत्तीनुसार आणि समजूतीनुसार बोलला. यातून त्यांचा हेतूही उघड झाला. देशातील जनतेने सर्व काही पाहिले, असं ते म्हणाले.

भाषणापूर्वी BRS चं वॉकआऊट
पंतप्रधानांचे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी सभागृहातील विरोधी सदस्यांनी अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी करणारे फलक फडकावले. यावर स्पिकर ओम बिर्ला यांनी अडवणूक करत तुम्हाला नेम केलं जाऊ शकतं, असे सांगितले. यानंतर बीआरएसच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. पीएम मोदी संसदेत म्हणाले, ‘मी काल पाहत होतो. काही लोकांच्या भाषणानंतर काही लोक आनंदाने ‘ये हुई ना बात’ म्हणत होते. कदाचित ते चांगले झोपले आणि (वेळेवर) उठू शकले नाहीत. त्यांच्यासाठी ‘ये कह कह के हम दिल को बेहेला रहे है, वो अब चल चुके, वो अब आ रहे है’ असं मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT