राजकारण करायला उभा जन्म पडलाय, पण… शिवसेनेनं भाजपला सुनावलं!
मुंबई: कोरोना संकट राज्यात थैमान घालत असताना विरोधी पक्षाकडून याबाबत मात्र राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे. त्यामुळे विरोधकांनी निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागावं, बोलावं. असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘कोरोनाचा विषाणू किती धोकादायक आहे हे एम्सच्या संचालक डॉ. रणदीप […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना संकट राज्यात थैमान घालत असताना विरोधी पक्षाकडून याबाबत मात्र राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे. त्यामुळे विरोधकांनी निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागावं, बोलावं. असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘कोरोनाचा विषाणू किती धोकादायक आहे हे एम्सच्या संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एम्सचे संचालक देशाला गुमराह करीत आहेत असं महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन एम्सच्या दारात जोरदार आंदोलनं केली पाहिजेत.’ असा टोला देखील सामनातून हाणला आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
‘कोरोना’ चा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘ एम्स ‘ सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स ‘ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, असं म्हणत पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर! तेव्हा काळजी घ्या!
-
निर्बंध सैल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ”राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.” दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे?