फोनवरुन काम मीही करतो, फक्त समोर कॅमेरा लावत नाही, अजित पवारांचा रोख कुणाकडे?
पुणे: पुण्यात एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणात सांगितले होते की, मी सदैव जनतेच्या संपर्कात राहिल. त्यानुसार मागील तीन चार दिवसापासून फोनवरून कामे मार्गी लावतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, आपल्याला माहिती नाही हे मी सुरवातीपासून करत आलेलो आहे, […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यात एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणात सांगितले होते की, मी सदैव जनतेच्या संपर्कात राहिल. त्यानुसार मागील तीन चार दिवसापासून फोनवरून कामे मार्गी लावतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, आपल्याला माहिती नाही हे मी सुरवातीपासून करत आलेलो आहे, मी फक्त असं कॅमेरे बिमारे लावत नाही.
मी आपल काम करीत असतो. तुम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मी कुठला ही फोन आला की लाव फोन लगेच म्हणत असतो. परंतु फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव अस सांगत नाही असे म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायती यांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे. ओबीसी समाजाचा आरक्षणचा प्रश्न मार्गी न लावता, या निवडणुका होत आहेत, पण या समाजाच्या आरक्षणचा देखील यामध्ये समावेश केला पाहिजे. मात्र हा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर 12 तारखेला निकाल आहे.
उत्तर प्रदेशाप्रमाने निकाल लागला पाहिजे. तसे झाल्यास ओबीसी समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश करूनच निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.










