मोदींच्या दौऱ्याआधी पगडीचा वाद! ऐनवेळी तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीच बदलल्या, कारण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधान येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागतही जोरदार होणार यात काहीच शंका नाही. त्यांना तुकोबारायांची पगडी दिली जाणार होती त्यावर काही ओळी होत्या. त्या ओळी ऐनवेळी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी बदलण्यात आल्या आहेत. तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं जातं. त्यांच्या भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधान येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागतही जोरदार होणार यात काहीच शंका नाही. त्यांना तुकोबारायांची पगडी दिली जाणार होती त्यावर काही ओळी होत्या. त्या ओळी ऐनवेळी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी बदलण्यात आल्या आहेत. तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं जातं. त्यांच्या भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे माथी हाणू काठी… या होत्या. मात्र या ओळी बदलल्या गेल्या आहेत.
ADVERTISEMENT
काय होतो भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे माथी हाणू काठी… ओळींचा अर्थ नेमका काय ?
जो आमच्याशी चांगला वागेल त्याच्यासाठी आम्ही खूपच चांगले आहोत, आमच्याशी प्रेमाने वागणाऱ्या माणसाला आम्ही कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊन मात्र आमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला काठीचे फटके द्यायला देखील आम्ही मागेपुढे बघत नाही. हा या ओळींचा अर्थ होतो.
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूला येतील. त्यावेळी त्यांना जी पगडी देण्यात येणार आहे त्यावरच्या ओळी आता बदलण्यात आल्या आहेत. या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या ओळी आता या पगडीवर असणार आहेत.
ज्याला सर्वत्र परम परमात्मा विष्णूचे अस्तित्व दिसते तोच खरा वैष्णव आहे. प्रत्येक वैष्णवाचा हाच धर्म आहे की सर्वत्र नारायणाचे वास्तव्य आहे. प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे मानवामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. याच भावनेमुळे खरा वैष्णव कधीही कोणाचाही मत्सर करत नाही. असा भेदाभेद अमंगळ या ओळींचा अर्थ होतो. या ओळी असलेली पगडी आता मोदींना भेट म्हणून दिली जाणार आहे.
ADVERTISEMENT
१४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कसा असणार आहे?
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरूवातीला देहूमध्ये येऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं लोकर्पण करतील
जल भूषण या इमारतीचंही उद्घआटन करतील. राज्यासाठी तसंच देशासाठी बलिदान ज्यांनी दिलं त्यांच्या चित्रांच्या गॅलरीचंही लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा असणार आहे.
मोदींसाठी बनवलेली पगडीवरच्या अभंगाच्या ओळीवर आक्षेप पगडीवर लिहीलेल्या अभंगाच्या ओळी (पद) बदलाव्या लागल्या
‘भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।।‘ ह्या ओळी अगोदर लिहीलेल्या होत्या. देहू संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी अभंगाच्या ओळी (पद) बदलाव्या लागल्या. आता ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ‘ या ओळी लिहील्या आहेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT