२०२० मधलं पालघर साधू हत्याकांड प्रकरण, महाराष्ट्र सरकार तपास CBI कडे सोपवणार
कानू सारडा, प्रतिनिधी, आज तक पालघरमधलं २०२० मध्ये झालेलं साधू हत्याकांड प्रकरण महाराष्ट्र अद्याप विसरलेला नाही. या साधूंची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय आता शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे. पालघरचं […]
ADVERTISEMENT

कानू सारडा, प्रतिनिधी, आज तक
पालघरमधलं २०२० मध्ये झालेलं साधू हत्याकांड प्रकरण महाराष्ट्र अद्याप विसरलेला नाही. या साधूंची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय आता शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.
पालघरचं साधू हत्याकांड आहे काय?
पालघरमधल्या गडचिंचले या गावात चोर आणि दरोडेखोर शिरल्याची अफवा पसली होती. ज्यानंतर गावकऱ्यांनी गावाची काळजी घेण्याच्या उद्देशाने एकत्रित पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. १६ एप्रिलच्या २०२० रात्री दोन साधू आणि त्यांचा वाहन चालक यांची गाडी अडवून त्यांना जमावाने दगडाने ठेचून ठार केलं होतं. हे दोन साधू अंत्यसंस्कारांसाठी गुजरातमधल्या सुरतला चालले होते. त्यावेळी त्यांची विचारपूसही न करता त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली.
काठ्यांनी मारहाण आणि दगडफेक करून हत्या
साधूंनाच चोर-दरोडेखोर समजून त्यांच्यावर जमावाने लाठ्या-काठ्यांनी आणि दगडफेक करत हल्ला केला. पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र हा जमाव इतका भडकला होता की त्या जमावाने पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैना करत १०१ जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील ९ आरोपी हे १८ वर्षांखालील होते त्यामुळे त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं.