Panama Papers Leak: ऐश्वर्या राय बच्चनला ED ने बजावलं समन्स, पण…
मुंबई: पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला समन्स बजावण्यात आलं आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ईडीच्या म्हणण्यानुसार, आज ऐश्वर्या राय बच्चन चौकशीत सहभागी होणार नसल्यामुळे ईडी लवकरच तिला नवीन समन्स बजावणार आहे. याप्रकरणी अलीकडेच ईडीने अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते. ऐश्वर्या राय बच्चनला […]
ADVERTISEMENT

मुंबई: पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला समन्स बजावण्यात आलं आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ईडीच्या म्हणण्यानुसार, आज ऐश्वर्या राय बच्चन चौकशीत सहभागी होणार नसल्यामुळे ईडी लवकरच तिला नवीन समन्स बजावणार आहे. याप्रकरणी अलीकडेच ईडीने अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.
ऐश्वर्या राय बच्चनला याआधी ईडीकडून दोनदा बोलविण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही वेळा तिने नोटीस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर ही विनंती करण्यात आली होती. मात्र, आता तिला समन्स बजावण्यात आलं आहे.
फेमा प्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स 9 नोव्हेंबर रोजी ‘प्रतिक्षा’ म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. त्यावर 15 दिवसांत उत्तर मागितले होते. ज्याला ऐश्वर्याने ईमेलद्वारे उत्तर दिले होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या SITमध्ये ईडी, आयकर आणि इतर एजन्सींचा समावेश आहे.
काय आहे पनामा पेपर लीक?