TET Exam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त पदभार असलेल्या तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील भरती परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असतानाच म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून ही माहिती समोर आल्यानंतर म्हाडातील विविध पदांसाठीची परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणात आरोपी डॉ. प्रीतिश देशमुखसह पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईनंतर घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांना डॉ. प्रीतिश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेचे ओळखपत्र सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे वाचलं का?

प्रीतिश देशमुखच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना परीक्षेसंबंधित बरंच साहित्य मिळालं होतं. त्यात टीईटी परीक्षेच्या ओळखपत्रांचाही समावेश आहे. ही ओळपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. कालपासून त्यांची चौकशी केली जात होती. चौकशीनंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

MHADA Exam Cancel : पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

ADVERTISEMENT

नेमकं काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू होता. संशयितांच्या हालचालीचा मागोवा घेऊन पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ या दोघांच्या हालचालीचा मागोवा घेतला. त्यांना Creta गाडीमधून (क्रमांक MH20 /EL 7111) ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या गाडीमध्ये डॉ. प्रीतिश देशमुख हेही आढळून आले. प्रीतिश देशमुख हे G.A.software या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या संस्थेतर्फे MHADA च्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार होत्या.

प्रीतिश देशमुख याच्या झडतीमध्ये त्याच्यासोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले होते. तसेच त्यांच्यासोबत लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले होते. त्यामध्येही MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट होते. ही कारवाई करताना प्रीतिश देशमुखकडे टीईटी परीक्षेची ओळखपत्र आढळून आल्यानं टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT