Parambir Singh देशाबाहेर गेले आहेत का? दिलीप वळसे पाटील यांनी दिलं उत्तर म्हणाले..
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून गेले आहेत अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करतो आहोत. परमबीर सिंग हे कुठे आहेत त्याचा शोध सुरू आहे. ते एक सरकारी अधिकारी आहेत त्यांना देश सोडून जायचं असेल तर त्यांना रितसर परवानगी […]
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून गेले आहेत अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करतो आहोत. परमबीर सिंग हे कुठे आहेत त्याचा शोध सुरू आहे. ते एक सरकारी अधिकारी आहेत त्यांना देश सोडून जायचं असेल तर त्यांना रितसर परवानगी काढावी लागणार आहे. तरीही ते संमती न घेता गेले असतील तर ही बाब चांगली नाही. महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत आहे.
ADVERTISEMENT
त्यांच्यावर डिपार्टमेंटकडून कारवाई केली जाणार आहे. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर त्यांच्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं सरकारला परमबीर सिंग यांच्याकडून हवी आहेत. सरकार नियमांनुसार जी कारवाई आहे ती करतं आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
Parambir Sing यांच्याविरोधात चांदिवाल आयोगाने काढलं दुसरं वॉरंट
हे वाचलं का?
तपास यंत्रणांनाही हेच वाटतं आहे की परमबीर सिंग यांनी देश सोडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून रशियाला गेले असावेत असं तपास यंत्रणांना वाटतं आहे. 7 एप्रिलला परमबीर सिंग हे तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. 25 फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. 25 फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकरणानंतर 17 मार्चला परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्ड्स खात्यात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार 22 तारखेला स्वीकारला. त्यानंतर 4 मे पर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. 5 मेपासून परमबीर सिंग सुट्टीवर गेले.
परमबीर सिंग यांनी आपल्याला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्याचं कारण देऊन रजा घेतली. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीर सिंग यांनी आपली प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचं सांगितलं आणि रजा वाढवून घेतली. परमबीर सिंग यांना 29 ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT