परमबीर सिंग यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता, निवृत्त एसीपींनी केला खळबळजनक आरोप

मुंबई तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देशाबाहेर पळाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने कोर्टातही तशी माहिती दिली होती. अशात परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला आणि आपण चंदीगढमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. परमबीर सिंग कुठे आहेत हे इतक्या महिन्यांनी 24 नोव्हेंबरला समजलं आहे. अशातच त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देशाबाहेर पळाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने कोर्टातही तशी माहिती दिली होती. अशात परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला आणि आपण चंदीगढमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. परमबीर सिंग कुठे आहेत हे इतक्या महिन्यांनी 24 नोव्हेंबरला समजलं आहे. अशातच त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा हा आरोप आहे. यासंदर्भातलं एक पत्रच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पाठवलं आहे.

काय म्हटलं आहे शमशेर पठाण यांनी?

26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमिर कसाबचा मोबाईल परमबीर सिंग यांनी लपवल्याचा आणि दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप शमशेर पठाण यांनी केला. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी पत्रात केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp