नर्सने चोरून विकले रेमडेसिवीर, घरातही सापडले ‘एवढे’ इंजेक्शन
परभणी: राज्यात सध्या रेमेडेसिवीर इंजेक्शनचा (Remedesivir Injection) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन अनेक ठिकाणी अव्वाचा सव्वा भावाने विकलं जात असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. पण आता याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या परभणी (Parbhani) जिल्हा शासकीय रुग्णालयातील नीता […]
ADVERTISEMENT
परभणी: राज्यात सध्या रेमेडेसिवीर इंजेक्शनचा (Remedesivir Injection) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन अनेक ठिकाणी अव्वाचा सव्वा भावाने विकलं जात असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. पण आता याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या परभणी (Parbhani) जिल्हा शासकीय रुग्णालयातील नीता केशव काळे नामक नर्ससह दत्ता शिवाजी भालेराव (वय 21) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा सुरु आहे. रुग्णांसह त्यांचे कुटुंबीय या इंजेक्शनसाठी वणवण फिरत आहेत. या स्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही व्यक्ती इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या बाबी समोर आल्यानंतर परभणी पोलिसांनी सापळा रचून बेकायदेशीर इंजेक्शन विकणाऱ्यांना अटक केली.
हे वाचलं का?
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अटक केलेल्या महिलेच्या घरावर देखील छापा मारला. यावेळी घराची झडती घेतली असता त्यांना 75 हजार रुपये रोख व 7 रेमडेसिवीर इंजेक्शन आढळून आले. या परिचारिकेने जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीतील कोव्हिड सेंटरमूधन ते इंजेक्शन चोरल्याचं कबूल केलं आहे. या पथकाने महिलेकडून मोबाइल देखील जप्त केला आहे.
Covid Emergency: महाराष्टात Oxygen, रेमडेसिवीर, बेड, प्लाझ्मा कोणतीही वैद्यकीय मदत हवी? तर हे फोन नंबर येतील कामी
ADVERTISEMENT
रेमडेसिवीर ही काही मॅजिक बुलेट नाही!
ADVERTISEMENT
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाच्या एका पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं होतं की, रेमडेसिवीर इंजेक्शन हे काही मॅजिक बुलेट नाही.
‘खरं तर कोरोना या आजाराला एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण याबाबत अद्याप फार काही डेटा उपलब्ध होऊ शकलेला नाही. खरं तर या सगळ्यात रेमडेसिवीरविषयी बरीच चर्चा सुरु आहे. पण याबाबत मी स्पष्ट करु इच्छितो की, रेमडेसिवीर ही काही मॅजिक बुलेट (जादूची गोळी) नाही. आपण ते वापरतो कारण आपल्याकडे अँटी व्हायरल औषध नाही. खरं तर आपण चांगलं अँटी व्हायरल औषध शोधण्यात कोणतीही मोठी प्रगती केलेली नाही.’ असं ते यावेळी म्हणाले होते.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’
मात्र, असं असून देखील रेमडेसिविर याविषयी लोकांमध्ये जो समज आहे त्याचाच फायदा घेऊन आता काही जण सामान्यांना लुबाडत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT