Pathaan : पठाणची तुफान कमाई; अवघ्या 12 दिवसांत गाठला इतका मोठा आकडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan box office collection Day 12 : शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा (Shahrukh khan movie pathaan) जलवा 12 व्या दिवशीही पाहायला मिळाला(12th day collection). शाहरुख खानने इतिहासाच्या पानांमध्ये धमाकेदार कमबॅक नोंदवले आहे. पठाणांचे वादळ असे आहे की थांबण्याचे नाव घेत नाही. शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण होणार आहेत. मात्र चित्रपटाची जलद कमाई अजूनही सुरूच आहे. (The film continues to earn fast)

ADVERTISEMENT

Kangana: ‘पठाण’वरून कंगना-उर्फीमध्ये ट्विटर वॉर! PM मोदींचाही उल्लेख

बॉक्स ऑफिसवर पठाणची हवा

शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर खूप चालत आहे. तुफानी वेगाने कमाई करताना हा चित्रपट सातत्याने अनेक विक्रम मोडत आहे. पहिल्या वीकेंडप्रमाणेच दुसऱ्या वीकेंडलाही पठाणने जादू निर्माण केली आहे. पठाणची दुसऱ्या रविवारच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी अशी धमाकेदार कमाई करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

हे वाचलं का?

दुसऱ्या रविवारी 28 कोटींची कमाई

ट्रेंड अनॅलिस्ट रमेश बाला यांच्या मते, पठाणचे दुसऱ्या रविवारी संपूर्ण भारतात 28 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या रविवारीही चित्रपट सुसाट चालला आहे. शाहरुखच्या पठाणने दुसऱ्या रविवारी 28 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. भाऊ, असा धमाका फक्त किंग खानच करू शकतो असे म्हणावे लागेल.

पठाणने 800 कोटींचा टप्पा पार केला

पठाणचा जलवा केवळ भारतातच नाही, तर जगभरात पाहायला मिळाला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसप्रमाणेच परदेशातही पठाणचा डंका वाजत आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते पठाणचे जगभरातील एकूण कलेक्शन सुमारे 850 कोटी रुपये आहे. अवघ्या 12 दिवसांत 850 कोटींचा आकडा गाठणे हे पठाण चित्रपटाचे मोठे यश आहे.

ADVERTISEMENT

Pathaan : “ते काम दुसरं कोणी करु शकत नाही”; रेणुका शहाणे-SRK चा मजेशीर संवाद

ADVERTISEMENT

पठाणने दंगलला टाकले मागे

शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, आमिरचा दंगल हा हिंदी सिनेमातील सर्वात मोठा चित्रपट होता, ज्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर 387 कोटी रुपयांची कमाई केली होती, परंतु आता शाहरुख खानच्या पठाणने कमाईच्या बाबतीत आमिरच्या दंगलला मागे टाकले आहे आणि आता पठाण भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 430 कोटींची कमाई केली आहे आणि कमाई अजूनही सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT