Pawan Khera: दिल्लीत ड्रामा, सुप्रीम कोर्टात दिलासा! खेरा मोदींबद्दल काय बोलले?
Pawan Khera Statement: नवी दिल्ली: काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. दिल्ली विमानतळावर आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खेरा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या एका विधानावरून राजधानी दिल्लीत राजकीय ड्रामा बघायला मिळाला. पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी […]
ADVERTISEMENT
Pawan Khera Statement: नवी दिल्ली: काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. दिल्ली विमानतळावर आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खेरा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या एका विधानावरून राजधानी दिल्लीत राजकीय ड्रामा बघायला मिळाला. पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आसाममध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आसाम पोलिसांनी खेरा यांना दिल्लीत अटक केली. मात्र, आसाम पोलिसांना सुप्रीम कोर्टात झटका बसला.
पवन खेरा यांच्या अटकेवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरुद्ध आक्रमक झाल्यानं दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा घडला. पवन खेरा यांच्याविरुद्ध तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने पवन खेरा यांना दिलासा देताना तीन गुन्हा एकत्र करण्याचे आदेश दिले. मात्र, या गुन्ह्यांवर कोणत्या न्यायालयात सुनावणी होणार हे निश्चित झालेलं नाही.
हे वाचलं का?
पवन खेरांनी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. पवन खेरा यांच्याविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्या त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
Rahul Gandhi : नोटीस आली, खासदारकीवर टांगती तलवार; राहुल गांधी म्हणाले…
ADVERTISEMENT
पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी केली अटक
आसाम पोलिसांनी पवन खेरांना दिल्ली विमानतळावरच अटक केली. खेरा इंडिगोच्या फ्लाईटने रायपूरला निघाले होते, मात्र त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसनं अटकेला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिलं.
ADVERTISEMENT
मोदींबद्दलचं विधान अनावधानाने, सुप्रीम कोर्टात काय झाला युक्तिवाद
पवन खेरा यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सिंघवी कोर्टात म्हणाले की, “पवन खेरा यांनी त्यावेळी माफी मागितली होती. हे विधान स्लिप ऑफ टंग म्हणजेच अनावधानाने केलं गेलं. पवन खेरांना करण्यात आलेल्या अटक रोखण्यात यावी.”
मोदींना ‘मन की बात’वरून डिवचलं; राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले?
पवन खेरांनी काय केलं होतं विधान?
पवन खेरा यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून एक पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेतच पवन खेरांनी मोदींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरेंद्र गौतम दास मोदी असा केला होता. याच विधानावरून पवन खेरा यांच्याविरुद्ध आसाम, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT