विकृत वासनेने हपापलेले नराधम… जंगलात जाऊन घोरपडीवर बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी / इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी (कोल्हापू-सातारा)

ADVERTISEMENT

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक अत्यंत किळसवाणा आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त्रासह शिकारीसाठी जंगलात घुसलेल्या काही वासनांध आरोपींनी चक्क घोरपडीवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपीचे मोबाइल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वन खातेही चक्रावले असून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या आरोपींनी केलेला घृणास्पद प्रकार मोबाइलमध्ये पुरव्यासह असला तरी कोणता गुन्हा नोंद करायचा हा प्रश्न वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. या प्रकरणी संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.

हे वाचलं का?

घोरपडीसारख्या साडेचार फुटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींना आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिघे कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आलेले होते. संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे. या आरोपीनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं आहे. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाइल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका आरोपीने घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाइलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

संभोग करताना आरोपीच्या मोबाइलमधून त्याचे चित्रीकरणही केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का?, आरोपीने इतर कोणत्या वन्यप्राण्यासोबत संभोग केला आहे का? याबाबतची चौकशी देखील सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी यावेळी दिली आहे.

वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र आणि घृणास्पद घटना आहे. त्यामुळे ही केस मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल. असंही विशाल माळी यांनी सांगितलं आहे

याशिवाय शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले आहे. तसेच शिकार केलेल्या ससा, पॅंगोलिन, साळिंदर, पिसुरी हरिण यांचे फोटोही त्यांच्या मोबाइलमध्ये सापडले आहे.

चुकीला माफी नाही ! पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आईने मुलाला धाडलं तुरुंगात

देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहाप्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणाऱ्याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद या कायद्यांतर्गत आहे.

दरम्यान, या नराधम आणि वासनेने विकृत झालेल्या या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक वन्यजीव संघटनांकडून करण्यात येत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT