Petrol-Diesel Price update : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका!
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू होती. निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या झळा सर्वसामान्यांना बसतील, असा अंदाज वर्तवला जात होत. अखेर अंदाज खरा ठरला असून, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशात बुधवारी (२३ मार्च) पेट्रोल-डिझेलच्या दरात पेट्रोल कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८० पैशांची वाढ करण्यात […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू होती. निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या झळा सर्वसामान्यांना बसतील, असा अंदाज वर्तवला जात होत. अखेर अंदाज खरा ठरला असून, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.
ADVERTISEMENT
देशात बुधवारी (२३ मार्च) पेट्रोल-डिझेलच्या दरात पेट्रोल कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७.०१ रुपयांवर तर डिझेल ८८.२७ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडकाच उडाला असून, याचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. भारतातही तेल वितरक कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरूवात केली असून, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलच्या दराचा भडकाच उडाला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १११.६७ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेलचेही भाव प्रति लिटर ९५.८५ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे.
हे वाचलं का?
देशातील प्रमुख महानगर असलेल्या कोलकातामध्येही पेट्रोलचे भाव १०६.३४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. डिझेलही प्रति लिटर ९१.४२ रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईतही पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर १०२.४२ रुपये, तर डिझेल ९२.९५ रुपये प्रति लिटर विकत घ्यावं लागत आहे.
निवडणूक निकाल लागताच दरवाढ सुरू…
ADVERTISEMENT
देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ स्थिर झाली होती. उलट सरकारने नोव्हेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १० रुपये, तर डिझेलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांची कपात झाली होती. निवडणुकीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले. मात्र, १० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर २२ मार्चपासून पुन्हा एकदा दरवाढीचा आलेख वरच्या दिशेनं सरकू लागला आहे.
ADVERTISEMENT
स्वयंपाकांचा गॅसही महागला
इंधन दरवाढीबरोबर घरगुती स्वयंपाकांच्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. अलिकडेच कंपन्यांनी स्वयंपाकांच्या १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशभरात एलपीजी सिलिंडरचे दर १००० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. ६ ऑक्टोबर २०२१ नंतर ही दरवाढ करण्यात आलेली असून, मुंबईत स्वयंपाकाच्या सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये, तर पुण्यात ९५२ रुपये मोजावे लागणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT