Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला! मुंबईत डिझेलच्या दराचाही भडका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळी तोंडावर येत असताना देशात महागाई गगनाला भिडली असून, दररोज वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांचं गणित कोलमडताना दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत असून, आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमती लिटरमागे 35 पैशांनी वाढल्या. यात डिझेल्याच्या किंमतीही पेट्रोलच्या जवळ पोहोचल्या आहेत.

ADVERTISEMENT

ऑक्टोबर महिन्यात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असून, मध्ये काही दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पुन्हा दरवाढ केली केली जात आहे. तेल वितरण कंपन्यांनी आज (30 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली.

Petrol Diesel Under GST : शंभरीवर गेलेलं पेट्रोल 70 रूपयांत कसं मिळणार? | समजून घ्या

हे वाचलं का?

तेल वितरक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दर लिटरमागे 108.99 रुपयांवर म्हणजे 109 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दरही 97.72 रुपये लिटरवर पोहोचले आहेत. देशातील प्रमुख तीन महानगरातील पेट्रोलबरोबर डिझेलच्या दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलबरोबरच डिझेलही शंभरीच्या पुढे गेले आहेत. आज झालेल्या इंधन दरवाढीनंतर मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 114.81 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचे दरही 105.86 रुपये लिटरवर पोहोचले आहेत.

ADVERTISEMENT

समजून घ्या : पेट्रोल 100 रूपयांना का मिळतंय?

ADVERTISEMENT

चेन्नई आणि कोलकातातही इंधन दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 109.46 रुपये लिटर झालं असून, डिझेल 100.84 रुपये लिटर झालं आहे. तर चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर 105.74 रुपये, तर डिझेल 101.92 रुपये लिटरवर पोहोचले आहे.

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7 रुपयांनी महागलं

सप्टेंबरच्या अखेरीपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अपवाद वगळता दररोज दरवाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती 35 पैशांच्या आसपास वाढल्या. त्यामुळे एका महिन्याच्या कालावधीत पेट्रोल 7 रुपयांनी महागलं असून, काही शहरांमध्ये नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल 120 रुपये मोजावे लागत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT