मनसुख हिरेन प्रकरणात पोस्ट मार्टम पूर्ण, ठाणे पोलीस म्हणतात…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घराबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्रा खाडी येथे सापडला. यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. पोलिसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला होता. फॉरेन्सिक लॅबच्या प्रमुखांकडून हिरेन यांच्या मृतदेहावर […]
ADVERTISEMENT
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घराबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्रा खाडी येथे सापडला. यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. पोलिसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला होता. फॉरेन्सिक लॅबच्या प्रमुखांकडून हिरेन यांच्या मृतदेहावर पोस्ट मार्टम करण्यात आलं आहे. हिरेन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे मात्र पोलिसांनी अद्याप सांगितलेलं नाहीये.
ADVERTISEMENT
सविस्तर अहवाल हातात आल्यानंतरच याबद्दलची माहिती दिली जाईल असं ठाणे पोलिसांचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मीडियाशी बोलताना दिली. मनसुख हिरेन प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी विधीमंडळातही पहायला मिळाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचीन वाझे यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत या घटनेचा तपास NIA कडे सोपवण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणानंतर मनसुख हिरेन यांच्या घराबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवलेली आहे.
फडणवीसांनी आरोप केलेले सचिन वाझे आहेत तरी कोण?
हे वाचलं का?
दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेचा तपास ATS कडे सोपवत असल्याची माहिती दिली. हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपले पती हे सोसायटीमधल्या मुलांना स्विमींग शिकवायचे, ते आत्महत्या करुच शकत नाहीत असा प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली आहे. दरम्यान सचिन वाझे यांच्या या प्रकरणाताली सहभागावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT