PM मोदी येणार मुंबईमध्ये! शिंदे-फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १९ जानेवारीला पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा नियोजीत आहे. नवी मुंबई मेट्रो, मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गिका, सॉलिड वेस्ट ट्रिटमेंट प्लॅंट या प्रकल्पांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी पक्षाची एक बैठक घेणार असल्याचीही माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांच्या याच दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक बैठक घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीला भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिंदे-फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह :

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दावोसमध्ये १६ ते २० जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारचे अधिकारी या दौऱ्यावर जाणार आहेत.

हे वाचलं का?

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्याप्रमाणे या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील उद्योगांच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे. अशातच आता शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यानचं पंतप्रधान मोदींचाही मुंबई दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे आता शिंदे फडणवीस यांना कदाचित दावोस दौऱ्याला जाता येणार नाही किंवा दौऱ्यातून लवकर माघारी यावं लागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT