हे आपलं सांस्कृतिक नुकसान, दिलीप कुमारांच्या निधनानंतर मोदींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी दिलीप कुमार यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खालावली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही आणि आज सकाळी साडेसात वाजता दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि बॉलिवूडमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.

चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार यांची कायम आठवण काठली जाईल. चित्रपटांमध्ये वावरताना त्यांचं तेज अतुलनीय होतं. त्यामुळेच त्यांनी अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. अशा शब्दांमध्ये मोदींनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे या यादीत घेता येतील. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT