मोदींची घोषणा! १४ ऑगस्ट Partition Horrors Remembrance Day म्हणून पाळला जाणार
भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारच्या स्मृती प्रित्यर्थ मोठी घोषणा केली. १४ ऑगस्ट हा दिवस देशात Partition Horrors Remembrance Day अर्थात फाळणी भय स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत […]
ADVERTISEMENT

भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारच्या स्मृती प्रित्यर्थ मोठी घोषणा केली. १४ ऑगस्ट हा दिवस देशात Partition Horrors Remembrance Day अर्थात फाळणी भय स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू आहे. उद्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारत-पाकिस्तान फाळणीवेळी झालेल्या अमानुष नरसंहारच्या स्मृतींना उजाळा दिला.
‘देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना विस्थापित व्हावं लागलं. तर अनेकांना जीवही गमवावे लागले. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ देशात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी भय स्मृती दिन (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
देश के बंटवारे के दर्द को कभी भुलाया नहीं जा सकता। नफरत और हिंसा की वजह से हमारे लाखों बहनों और भाइयों को विस्थापित होना पड़ा और अपनी जान तक गंवानी पड़ी। उन लोगों के संघर्ष और बलिदान की याद में 14 अगस्त को 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' के तौर पर मनाने का निर्णय लिया गया है।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
‘फाळणी भय स्मृती (Partition Horrors Remembrance Day) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि दुष्प्रवृत्तीचं विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर यातून एकात्मता, सामाजिक सद्भावना आणि माणसांप्रतीची संवेदनशीलतेची भावनाही वाढीस लागेल’, अशा भावना मोदी यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.