PM in Mumbai: मोदींचा महिनाभरात दुसरा मुंबई दौरा! कुणाला करणार लक्ष्य?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

pm Narendra Modi mumbai visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narnedra Modi) आज मुंबईत (Mumbai) असणार आहे. मुंबईत दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन वंदे भारत गाड्यांना (Vande Bharat Trains) हिरवा झेंडा दाखवणार असून, सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व (andheri East)येथील संकुलाचे उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसह इतर पायाभूत सुविधांचं उद्घाटन पीएम मोदींच्या हस्ते होणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने मोदी मुंबई दौऱ्यावर असले, तरी याकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2023) अनुषंगाने बघितलं जात आहे. नरेंद्र मोदी यांचा हा महिनाभराच्या आत दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात मोदी नेमका कुणावर निशाणा साधणार हेही औत्सुक्याचं असणार आहे. (PM Narendra modi in mumbai today)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कार्यक्रमांनिमित्त मुंबईत असणार आहे. दुपारी तीन वाजता पंतप्रधान मोदी यांचं मुंबईत आगमन होणार आहे. त्यानंतर मोदींच्या हस्ते मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत गाड्यांना हिरवी झेंडी दाखवणार आहेत. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे.

पंतप्रधान मोदी वाकोला ते कुर्लापर्यंत आणि एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपूलापर्यंत, तसेच मालाड येथील भुयारी मार्गाचं उद्घाटन करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमानंतर मोदी बोहरा मुस्लीम समुदायाच्या मरोळ येथील अलजेमा-तूस-सफिया अर्थात सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचं उद्घाटन करणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : ठाकरे गटाने भाजपची व्होट बँक केली टार्गेट?

मुंबई महापालिका निवडणूक : मोदींच्या दौऱ्याची का चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत रेल्वेगाड्या आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत असले, तरी या दौऱ्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बघितलं जात आहे. 19 जानेवारी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते.

ADVERTISEMENT

मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं. त्यानंतर मोदींचा इतक्या कमी कालावधीत दुसरा दौरा होत असल्यानं निवडणुका लवकरच लागण्याची चर्चा सुरू झालीये. निवडणुकांची चाहूल लागलेल्या राज्यात पंतप्रधान मोदींचे दौरे वाढताना दिसतात. कर्नाटकातही मोदींचे दौरे वाढले आहेत.

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी, भाषण जसंच्या तसं!

मुंबई महापालिका निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली?

मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपकडून जागर मुंबईचा यात्राही काढण्यात आली. यातून मुंबई महापालिकेच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवरही लक्ष्य करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही असंच विधान केलं होतं. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आमच्याकडे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढू असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मोदी रंणागणात उतरल्याचं दिसू लागलं आहे. त्याचं अंगाने मोदींच्या मुंबई दौऱ्याकडे बघितलं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT