हाती शिवबंधन बांधताच महंत सुनील महाराज संजय राठोडांबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बंजारा समाजाचं महत्त्वाचं तीर्थस्थान असलेल्या पोहरादेवी गड येथील महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महंत सुनील महाराजांचा सेनेतला प्रवेश हा शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना धक्का मानला जातोय. तसे महंत संकेत सुनील महाराज यांनीही दिलेत.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

महंत सुनील महाराज शिवसेना प्रवेशानंतर काय म्हणाले?

“बंजारा समाजाची काशी समजल्या पोहरादेवी येथे पंचमीची यात्रा सुरूये. तो मुर्हूत साधून मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटायला आलोय. मी मागेच सांगितलं होतं की, नवरात्रीत मोठा निर्णय होणार. राज्यात दीड ते दोन कोटी बंजारा भाविक आहे. बंजारा मतदार आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी. फक्त शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकतं. महाराष्ट्रातून पुष्कळ लोकांच्या हे लक्षात आलं, त्यामुळे आता शिवसेनेत पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरेंसोबत खंबीर उभे राहणार आहोत”, असं महंत सुनील महाराज यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

महंत सुनील महाराज संजय राठोडांविरुद्ध निवडणूक लढवणार?

‘संजय राठोडांना हद्दपार करणार?’ असा प्रश्न महंत सुनील महाराज यांना विचारण्यात आला होता. त्यावर सुनील महाराज म्हणाले, ‘आम्ही संजय राठोडांसोबत होतो. आता आम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत. मी संकल्प केला. उद्धव ठाकरेंना पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचं निमंत्रण दिलं. ठाकरेंनी ते स्वीकारलंय.”

महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्लान ठरला?

ADVERTISEMENT

“आम्ही महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन असल्यानं आम्ही पूर्ण राज्यात बंजारा समाज, बहुजन समाजाचा शिव सेवा संकल्प दौरा करणार आहोत. संपूर्ण बंजारा समाजाला उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठेवणार आहोत”, असं महंत सुनील महाराज म्हणाले. यावेळी संजय राठोडांविरुद्ध निवडणूक लढायची की नाही, हा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असंही त्यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT