कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता राज्य सरकारने निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागांत संचारबंदीसह अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. ज्यात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठीही नियम कडक करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस अधिकारी कारवाई करत आहेत. जळगाव शहरातील मंगलकार्यालयांची खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

अवश्य वाचा – लॉकडाउन लागलेल्या अमरावतीत काय सुरु काय बंद?? जाणून घ्या…

या पाहणीदरम्यान जळगावमधील सहा मंगलकार्यालयांत कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याचं लक्षात आलं. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, क्रेझी होम, निराई लॉन आणि कमल पॅराडाईज ही मंगल कार्यालयं सील केली आहेत. जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करत असल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान नियमांचं पालन न केल्याप्रकरणी या मंगल कार्यालयांच्या मालकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचसोबत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगर येथील दोन मंगल कार्यालयांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रमा गार्डन्स व सिद्धी मंगल कार्यालयाच्या मालकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही हॉलमध्ये लोकांची गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थाप कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही मंगल कार्यालय मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT