पोलीस पॉवर ! जिथे राडा केला त्याच भागातून पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी भागाताली निखळ भागात दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी दारुच्या नशेत रात्री रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. हातात धारदार शस्त्र घेत या दोन तरुणांनी रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनचालकांना धमकी देत त्यांच्यांवर वार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात एक जण जखमी झाला आहे. दरम्यान अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी याप्रकरणी आपली पॉवर दाखवून दिली आहे.

भररस्त्यात राडा घालणाऱ्या प्रतीक खरात आणि चेतन झावरे या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली असून ज्या रस्त्यावर त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्याच रस्त्यावरुन पोलिसांनी त्यांची धिंड काढली. सांगवी पोलिसांच्या पथकाने गुन्हेगारांच्या मनात जरब बसवण्यासाठी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत प्रतीक आणि चेतन यांनी दारुच्या नशेत निखळ भागातून येणाऱ्या वाहनांकडे पैशांची मागणी केली. काही वाहनचालक या दोन्ही आरोपींच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या प्रकरणात चार वाहनांचं नुकसान झालंय. अखेरीस दोघांनाही अटक झाल्यानंतर त्यांच्या हातात बेड्या ठोकत पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT