पोर्तुगीज महिलेचा विनयभंग करणाऱ्या आर्मी जवानाला पोलिसांनी केली अटक
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण पोर्तुगाल येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा 2019 मध्ये विनयभंग करण्यात आला होता. ही महिला 2019 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. ही महिला गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. रात्री साडेअकराच्या सुमारास एका व्यक्तीने या महिलेसोबत एका माणसाने अश्लील वर्तन केलं. या महिलेने यासंदर्भातली तक्रार भारतीय दुतावासात केली होती. भारतीय दुतावासाने […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण
पोर्तुगाल येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा 2019 मध्ये विनयभंग करण्यात आला होता. ही महिला 2019 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. ही महिला गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. रात्री साडेअकराच्या सुमारास एका व्यक्तीने या महिलेसोबत एका माणसाने अश्लील वर्तन केलं. या महिलेने यासंदर्भातली तक्रार भारतीय दुतावासात केली होती. भारतीय दुतावासाने यासंदर्भातली माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
बीड : दोन तरुणींनी तरुणाच्या घरी जाऊन केला विनयभंग; अंबाजोगाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा
अनेक प्रकाराच्या प्रक्रिया करत या प्रकरणी कल्याण जी आर पी ने गुन्हा दखल केला. मात्र हा आरोपी कोण आहे या बाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. तसंच त्याचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती नव्हता. पोलिसांनी या महिलेला संपर्क साधला तेव्हा महिलेने आरोपीचे वर्णन सांगीतले. या वर्णनाच्या आधारे कल्याण जी आर पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या. मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता. वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार पोलिसांनी घेतला.









