तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला : तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अखेर अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे, गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता.

नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्याने पुरातन नाणी गायब केली आहेत त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली ? त्यांचे साथीदार व सूत्रधार कोण ? ही नाणी सध्या कुठे आहेत यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहे.

हे वाचलं का?

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71 हजार 698 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणी वैयक्तिक स्वार्थासाठी चोरी केली. पोलिसांनी यानंतर नाईकवाडीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांत नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते. तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते , अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होतील.

ADVERTISEMENT

तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक  मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे.देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असुन यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत.या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

तुळजाभवानी देवीचे हे गायब केलेले प्राचीन दागिने व 71 नाणी कोणाला देण्यात आले हे तपासात स्पष्ट होणार आहे , यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू , साड्या , चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री , राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळविण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ही नाणी नाईकवाडी यांनी गायब करण्यामागे खरा सूत्रधार समोर येणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT