तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला पोलीस उप-निरीक्षकाने पळवलं, पतीच्या तक्रारीमुळे बारामतीत खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती शहरात पोलीस उप-निरीक्षकाने तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला पळवल्याची धक्कादायक तक्रार पतीने दाखल केली आहे. पुणे ग्रामीचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. परंतू पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर बारामती पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने जुन २०२१ मध्ये कौटुंबिक वादातून विष प्यायलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उप-निरीक्षक नितीन मोहीते यांची संबंधित महिलेसोबत ओळख वाढली. तक्रारदार महिलेचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरु झालं. यानंतर कालांतराने दोघांमधली जवळीक वाढत गेली. यावेळी नितीन मोहीतेला संबंधित महिलेला MPSC ची परीक्षा द्यायची असल्याचं कळलं.

यानंतर नितीन मोहीतेने या महिलेच्या पतीची भेट घेऊन तुमच्या पत्नीला अभ्यासात मदत करतो असं सांगत पुण्यात आपल्या नातेवाईकांकडे ठेवलं. आपली पत्नी शिकुन मोठी अधिकारी होईल असं समजून पतीनेही यासाठी परवानगी दिली. पदरात दोन मुली असतानाही संबंधित महिला पुण्याला गेल्यानंतर तिने कुटुंबाशी संवाद तोडणं सुरु केलं. यानंतर १६ जानेवारीला पतीला आपल्या पत्नीच्या हातावर अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू दिसला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने ‘असा’ काढला काटा

यावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर नितीन मोहीतेने पतीला फोन करुन जाब विचारला. मी तिला माझ्या कंपनीत १० टक्के वाटा देत आहे, पुन्हा तिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे. तुझे हात-पाय तोडून ठेवेन अशी धमकी पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दिल्याची तक्रार महिलेच्या पतीने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. यानंतर नितीन मोहीतेच्या दोन हस्तकांनी महिलेच्या पतीच्या घरी जात, पिस्तुल दाखवून आमच्या साहेबांविषयी काही बोललास तर मारुन टाकू अशी धमकी दिली.

ADVERTISEMENT

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर पेणमध्ये सामुहीक बलात्कार, सात जण अटकेत

ADVERTISEMENT

हे प्रकरण गंभीर झाल्यानंतर पतीने आपल्या भावंडांना याबद्दल माहिती दिली. यानंतर त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे याबद्दल तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणामुळे संबंधित महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून. त्यांना आता दोन लहान मुली आहेत. संबंधित अधिकाऱ्याने फसवणूक करून पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार करत जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केले आहे. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांसह सामाजिक संघटनांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT