रायगड : पोलिसाचा विवाहीत महिलेवर बलात्कार, पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत केले अत्याचार
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच विवाहीत महिलेला धमकावत तिच्यावर ६ वर्ष शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने अखेरीस पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस कर्मचारी शाम जाधवने महिलेला धमकावत गैरफायदा घेतला. तुझ्या पतीला आणि मुलाला मारुन टाकेन […]
ADVERTISEMENT
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच विवाहीत महिलेला धमकावत तिच्यावर ६ वर्ष शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने अखेरीस पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलीस असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस कर्मचारी शाम जाधवने महिलेला धमकावत गैरफायदा घेतला. तुझ्या पतीला आणि मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत आरोपीने सहा वर्ष पीडित महिलेशी संबंध ठेवले. अखेरीस आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली.
हे वाचलं का?
दरम्यान आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळताच आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना आरोपीने शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली.
अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
तसेच शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली. या याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस अधिक तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
पुणे : गोड बोलून आईला शेतात नेलं अन् केली हत्या; वडिलांचाही तोडला अंगठा; मुलाचं क्रूर कृत्य
श्याम जाधव पाच महिन्यांपूर्वी माथेरान पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना रात्रीच्या वेळेत टपरी बंद झाल्यानंतर पान दिले नाही म्हणून टपरी मालकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावेळी सदर वाद सोडविण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांच्या बरोबरही दादागिरी केली होती.
डोक्यात दगड घालून तरूणीची हत्या, कराड तालुक्यातली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT