LIC एजंटच्या घरावर पोलिसांचा छापा, कोट्यवधी रुपये केले जप्त
धुळे: धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब याच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे छापा टाकल्यानंतर राजेंद्र बंब याच्याकडून तब्बल दोन दिवसात पाच कोटीचीं मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. प्रथम कारवाईत 1 कोटी 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच 46 लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दुसऱ्या कारवाईत बँक व […]
ADVERTISEMENT

धुळे: धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब याच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे छापा टाकल्यानंतर राजेंद्र बंब याच्याकडून तब्बल दोन दिवसात पाच कोटीचीं मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. प्रथम कारवाईत 1 कोटी 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच 46 लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
दुसऱ्या कारवाईत बँक व योगेश्वरी पतसंस्थेतील लॉकर मधून 2 कोटी 54 लाख 88 हजार रुपये व 19 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोने पोलिसांनी जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
राजेंद्र बंब यांच्यावर कोणता गुन्हा?
राजेंद्र बंब याच्याकडे जयेश दुसाने नावाचा व्यक्ती कामाला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जयेशने बंब याच्याकडून त्याने दोन वेळा व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, राजेंद्र बंब याना पैशाच्या मोबदल्यात वडिलोपार्जित संपत्तीचे कागदपत्रे जयेशने दिले होते. पण व्याजासहीत पैशांची परतफेड केल्यानंतरही बंब यांनी जयेश याच्या संपत्तीचे कागदपत्रे परत केले नाही. त्यामुळे जयेश दुसाने यांनी बंब याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.