अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला २२ लाखांचा गुटखा, इंदापूरातील घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील इंदापूर नजिक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये पोलिसांना २२ लाख २७ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला आहे. इंदापूर पोलिसांनी हा गुटखा आणि २५ लाख रुपये किमतीचं सहाचाकी वाहन जप्त केलं आहे. या प्रकरणात आरोपी हनीफ सय्यद (राहणार बंगळुरु) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ९ जानेवारीला पहाटे हॉटेल देशपांडे व्हेजच्या समोर कर्नाटक पासिंगचा कंटेरनने ऊसाच्या ट्रॅक्टर ला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. याची इंदापूर पोलिसांना मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. जखमी वाहन चालकाला उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामध्ये कंटेनरचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने क्रेनच्या मदतीने तो इंदापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. त्यानंतर त्या कंटेनर मध्ये कोणता माल आहे, काही संशयास्पद तर नाही ना हे पाहिले असता विक्रीस व वाहतूकीस बंदी असलेला सुमारे २२ लाख रुपये किमतीची ४५ पोती शासनाने प्रतिबंधीत केलेला आर.के. प्रिमीयम कंपनीचा गुटखा मिळून आला. याचसोबत २५ लाख रूपये किंमतीचे एक सहा चाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास तपास सहाय्यक पोलुस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT