डोंबिवली : ट्रेन पकडताना तोल गेला, ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेला दोन जवानांनी वाचवलं

मुंबई तक

लोकल ट्रेन पकडताना धावती गाडी पकडू नका अशी सूचना आपण अनेकदा ऐकली आहे. तरीही कित्येक प्रवासी धावती लोकल पकडून आपला जीव धोक्यात घालत असतात. अनेकदा प्रवासी यात आपला जीव गमावून बसतात तर काहींना अंपगत्व येत. डोंबिवली रेल्वे स्थानकात आज महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन सतर्क जवानांमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. आज सकाळी 9 वाजून 17 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लोकल ट्रेन पकडताना धावती गाडी पकडू नका अशी सूचना आपण अनेकदा ऐकली आहे. तरीही कित्येक प्रवासी धावती लोकल पकडून आपला जीव धोक्यात घालत असतात. अनेकदा प्रवासी यात आपला जीव गमावून बसतात तर काहींना अंपगत्व येत. डोंबिवली रेल्वे स्थानकात आज महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन सतर्क जवानांमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत.

आज सकाळी 9 वाजून 17 डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 येथे एक महिला चालत्या लोकल मध्ये चढायला गेली. परंतू तोपर्यंत लोकलने वेग घेतला होता ज्यामुळे या महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली. यादरम्यान तिकडे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या विवेक पाटील आणि किरण राऊत या दोन जवानांनी प्रसंगवधान राखत तिला त्वरित बाजूला घेत तिचे प्राण वाचविले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी ही माहिती दिली.

हा अपघात टळल्यानंतर सदर महिलेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या त्या दोन जवानांचे, रेल्वे पोलिसांचे आणि आरपीएफचे आभार मानले आहेत. त्या दोन जवानांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर चालती गाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. आशा अनेक घटना देखील घडतात. मात्र सुरक्षितता आणि आपल्या जीवाची पर्वा करत प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp