राजकारणातले कट्टर शत्रू जेव्हा लग्न सोहळ्यात गप्पांचा फड रंगवतात…
राजकारणातले कट्टर शत्रू असलेले चार पक्ष कोणते हे विचारलं तर त्याचं उत्तर कुणीही देईल महाविकास आघाडी विरूद्ध भाजप. म्हणजेच महाविकास आघाडीत असलेले तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप. कोणताही विषय असला तरीही या पक्षांमध्ये आपसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आपण गेल्या दोन वर्षांपासून पाहतो आहोत. संजय राऊत यांनी आजच नाशिक दौऱ्यावर असताना कृषी कायदे […]
ADVERTISEMENT
राजकारणातले कट्टर शत्रू असलेले चार पक्ष कोणते हे विचारलं तर त्याचं उत्तर कुणीही देईल महाविकास आघाडी विरूद्ध भाजप. म्हणजेच महाविकास आघाडीत असलेले तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप. कोणताही विषय असला तरीही या पक्षांमध्ये आपसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आपण गेल्या दोन वर्षांपासून पाहतो आहोत.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी आजच नाशिक दौऱ्यावर असताना कृषी कायदे मागे घेणार म्हणून दुःख झाले ह्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर टीका करत त्यांच्या ह्या दुःखावर मी शोक संदेश पाठवणार असे म्हणत टीका केली, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी आंदोलनावरून टीका केली. मात्र भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात महाराष्ट्रातल्या राजकारणात उभा दावा असलेले हे कट्टर शत्रू एकमेकांसोबत असे मिसळून गेले की हे एकमेकांचे विरोधक आहेत की मित्र असा प्रश्न पडावा.
हे वाचलं का?
शिवसेना खासदार संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झाल्यानंतर उभे राहिले आणि त्यांचे हात हातात घेतले. तर आजच ज्या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले ते चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत सोबत मस्त गप्पा रंगवत आहेत असंही दिसलं. एकाच सोफ्यावर चंद्रकांत पाटील, संजय राऊत आणि या दोघांच्यामधे छगन भुजबळ असं चित्रही उपस्थितांनी पाहिलं. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेले हे सगळे नेते आज गप्पांचा फड रंगवाताना आणि दिलखुलास चर्चा करताना दिसले ही बाब नक्कीच विशेष म्हणावी लागेल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT