Prakash Ambedkar: ‘लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…’, आंबेडकरांची पवारांवर घणाघाती टीका
Prakash Ambedkar criticizes Sharad Pawar: अकोला: पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातील अनेक नेते आता त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash […]
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar criticizes Sharad Pawar: अकोला: पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातील अनेक नेते आता त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही याबाबत वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. (prakash ambedkar criticizes sharad pawar on fadnavis ajit pawar swearing in issue)
‘सकाळच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता, ही आपण मांडलेली भूमिका फडणवीसांच्या वक्तव्याने खरी ठरली आहे. त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे.’ असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते अकोला येथे बोलत होते. हीच भूमिका अजित पवारांनीही मांडली होती असं आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांची शरद पवारांवर बोचरी टीका
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘देवेंद्र फडणवीस जे म्हणाले तीच भूमिका नंतर अजित पवारांनी सुद्धा मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देता? माझ्या पार्टीचाही निर्णय होता. त्यामुळे आम्ही जे म्हणत होतो… की, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी.. हे मी मानलेलं खरं ठरलं..’ असा चिमटा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना काढला आहे.
शिवसेनेशी युती केल्यानंतरही प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यातच आता त्यांनीही आरोप केला आहे की, शरद पवार यांच्याच पाठिंबामुळे राज्यात पहाटेचा शपथविधी झाला होता. आता आंबेडकरांच्या या आरोपाला शरद पवार नेमका कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar: ‘फडणवीस सभ्य माणूस पण..’ पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी सुनावलं
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांचा आरोप, पवारांचं प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात शरद पवारांवर खळबळजनक आरोप केले होते. फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर भाष्य करताना म्हटलं की, ‘दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया.’
‘राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पण पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेला हा दावा तात्काळ शरद पवारांकडून खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपावर शरद पवार म्हणाले की?, ‘देवेंद्र फडणवीस हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे तरीही असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहीत नाही.’ असं म्हणतत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT