प्रकाश आंबेडकर ‘मविआ’मध्ये येणार? अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून दिला ग्रीन सिग्नल
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतचं एका व्यासपीठावर एकत्र येत नव्या मैत्रीचे संकेत दिले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीचे संकेत दिले. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) […]
ADVERTISEMENT

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतचं एका व्यासपीठावर एकत्र येत नव्या मैत्रीचे संकेत दिले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीचे संकेत दिले.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) – वंचितच्या आघाडीच्या चर्चा आहेत. याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठविला असल्याचं सांगितलं आहे. मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु काँग्रेससोबत आपली चर्चा झाल्याचं आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लागल्या होत्या.
अशाच आता, समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वंचित बहुनज आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही अनुकुल असल्याचं सांगितलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे. पण तयारी एका बाजूने असून चालत नाही. तयारी दोन्ही बाजूंनी असावी लागते. यापूर्वी अनेकदा आरपीआयमध्ये कवाडे गट, गवई गट, आठवले गट यांच्याशी आघाडी करुन निवडणुका लढविल्या आहेत.