औरंगाबादची आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर, ऑक्सिजन बेड्सची कमतरता

मुंबई तक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासत असून काही भागांमध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसत आहे. ३ एप्रिलला महाराष्ट्रात ४९ हजारांच्या वर नवीन कोरोना रुग्ण सापडले, तर २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आज निर्बंध लागू होणार? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासत असून काही भागांमध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसत आहे. ३ एप्रिलला महाराष्ट्रात ४९ हजारांच्या वर नवीन कोरोना रुग्ण सापडले, तर २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात आज निर्बंध लागू होणार? मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली कॅबिनेटची बैठक

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिघडत चालल्याचं चित्र निर्माण झालंय. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी दोन हजार ऑक्सिजन बेड्सची सोय करण्यात आली आहे. परंतू सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे हे सर्व बेड्स रुग्णांनी भरलेले असल्याचं चित्र आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत १४ हजारांच्या वर कोरोनाचे सक्रीय रुग्ण सापडले आहेत. शनिवारी १ हजार ३९४ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. ‘मुंबई तक’शी बोलत असताना औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. काही ठिकाणी खासगी हॉस्पिटल्स आणि संस्थांकडूनही मदत मागितली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

“जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल आणि संस्थांकडून आम्ही आता मदत मागत आहोत. सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्हाला जिथून मदत मिळेल तिकडून आम्ही ती घेत आहोत. गरजेच्या वेळी मदतीला येतील अशा १० संस्थांशी आमचं बोलणं सुरु आहे. यापैकी ५ जणांना आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या असून इत५ पाच जणांना लवकरच परवानगी मिळेल.” जिल्हा प्रशासन एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp