Pritam Munde: प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद हुकलं, फडणवीस ‘या’ प्रश्नावर का संतापले?
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं मंत्रिपद (Minister) हुकलं असल्याने मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याचबाबत विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं मंत्रिपद (Minister) हुकलं असल्याने मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याचबाबत विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती.
‘प्रीतम मुंडे या नाराज आहेत असं कोणी सांगितले? कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका. भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. त्यामुळे प्रीतम मुंडे या अजिबात नाराज नाही.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर फारसं भाष्य करणं टाळलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत असताना पंकजा आणि प्रीतम या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु बुधवारी दुपारपर्यंत प्रीतम मुंडे यांचं नाव मागे पडलं. त्यातच काही प्रसारमाध्यमांनी पंकजा मुंडे दिल्ली असल्याच्या बातम्या चालवल्या. यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन स्पष्ट केलं की, प्रीतम आणि मी मुंबईतील निवासस्थानी आहोत.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला 24 तास उलटून गेलेले असताना पंकजा किंवा प्रीतम मुंडे या दोघी भगिनींनी अद्यापही कोणालाही शुभेच्छा देखील दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.