पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात: भरधाव टँकरची अनेक वाहनांना धडक; 5 ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव टँकरने 10 ते 15 वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या या भीषण अपघातात 5 ठार झाले आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

ADVERTISEMENT

सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी अपघाताबद्दलची माहिती दिली. थिनर (रसायन) असलेला एक टँकर शुक्रवारी पुण्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास टॅँकर नवले पुलाजवळ आला. अचानक चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले.

भरधाव असलेल्या टँकरवरील नियंत्रण चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर टँकरने एकापाठोपाठ एक अशा 10 ते 15 वाहनांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

ADVERTISEMENT

या घटनेतील जखमींना तसेच वाहनाखाली अडकलेल्या काही जणांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान, या भीषण अपघाताच्या घटनेनंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आलं. पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT