पुणे : गोळीबार करुन 28 लाखांची रोकड लुटली, भरदिवसा झालेल्या थरारक चोरीमुळे खळबळ
पुणे : शहरातील मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. गाळा नंबर 11 मधील पी. एम. अंगडिया यांच्या कुरिअर कार्यालयात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात गाळा नंबर […]
ADVERTISEMENT
पुणे : शहरातील मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. गाळा नंबर 11 मधील पी. एम. अंगडिया यांच्या कुरिअर कार्यालयात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
याबाबत पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात गाळा नंबर 11 मध्ये पी. एम. अंगडिया यांचे कुरिअर कार्यालय आहे. तक्रारदार शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पैसे तपासून पाहिले. त्यानंतर काही वेळातच (पावणे बाराच्या सुमारास) इथे पाच ते सहा जण तोंडाला रुमाल बांधून आले.
दरोडेखोरांनी दारातून पिस्टल काढून तक्रारदार यांच्या दिशेने दाखवली. त्याचवेशी दुसऱ्या एका साथीदाराने त्यांना ढकलून कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार करुन काच फोडली. त्यानंतर संशयित आरोपी 28 लाखांची रक्कम घेऊन पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे. मार्केट यार्ड परिसरात व्यापारी आणि ग्राहकांची सतत वर्दळ असते. अशातच दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT