पुणे : बापच निघाला नराधम; 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एका आठवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या विद्यार्थिनीच्या हत्येनं हादरलेल्या पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक भयंकर घटना घडली आहे. 45 वर्षांच्या नराधमाने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. सहा महिन्यांपूर्वी पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वासनांध बापाने पोटच्या 11 वर्षाच्या मुलीवरच अत्याचार केले. सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडली. त्यानंतर काल पुन्हा बापाने मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मारहाण केली. त्यानंतर बापाकडून होत असलेले अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलींने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची हकिकत आईला सांगितली.

घटना नेमकी काय?

हे वाचलं का?

पोलिसांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. 45 वर्षीय आरोपी हा कोणतंही काम करत नाही. घरीच बसून असतो. तर पीडित मुलीची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते. त्यामुळे पीडितेची आई सकाळपासून रात्रीपर्यंत घराबाहेरच असते. पीडितेला एक बहीण व एक भाऊ आहे.

sakinaka Rape case : त्याला सगळी सूट देऊया! काय?; अभिनेत्री हेमांगी कवीचा सवाल

ADVERTISEMENT

सहा महिन्यांपूर्वी नराधम बापाने पहिल्यांदा पोटच्या मुलीवर बलात्कार केला. त्या दिवशी दोन्ही मुलांना आरोपीने घराबाहेर खेळायला पाठवलं. त्यानंतर पीडितेला ‘तू मोठी झाली आहे का? हे पाहायचं आहे’, असं सांगत बलात्कार केला. या कृत्यानंतर ‘ही गोष्ट तुझ्या आईला सांगितली तर तुला ठार मारेन’, अशी धमकीही दिली. पीडिते धमकीमुळे कुठेही यांची वाच्यता केली नाही.

ADVERTISEMENT

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नराधम बापाने पुन्हा एकदा पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलीने धाडस करत त्याला विरोध केला. विरोध करत असल्याच्या रागातून नराधमाने पीडितेला बेदम मारहाण केली. दरम्यान, रात्री कामावरून घरी आल्यानंतर पीडितेच्या आईला शेजारी महिलेकडून मुलीला वडिलांनी मारहाण केल्याचं कळलं.

कबड्डीपटूची हत्या : “ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं”

मारहाणीबद्दल मुलीच्या आईने नवऱ्याला विचारलं. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्या उत्तरांवर समाधान न झाल्याने त्या आईने मुलीला विश्वासात घेतलं आणि काय घडलं याबद्दल विचारणा केली. त्यानंतर पीडितेच्या संयमाचा बांध फुटला आणि बापाने केलेल्या अत्याचाराची हकिकत तिने आईला सांगितली.

आईने त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत वाकड पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी संगीता गोडे करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT