पुण्यात पोलीस अधिकाऱ्याचं भयंकर कृत्य; पोलीस पत्नीवरच केला अनैसर्गिक अत्याचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील गुन्हेगारी घटनांची राज्यभरात चर्चेत असून, पुन्हा एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षक असलेल्या स्वतःच्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अधिकाऱ्याने सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाली. या प्रकरणी सहायक पोलीस फौजदार पतीविरोधात खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

40 वर्षीय सहायक पोलीस फौजदाराने हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, आरोपी सहायक पोलीस फौजदार बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. त्या अधिकाऱ्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचं खोटं सांगून महिला पीएसआय अधिकार्‍याशी 7 वर्षापूर्वी लग्न केलं.

आरोपी लग्न झाल्यापासूनच पीडित महिलेला शारीरिक, मानसिक स्वरूपात त्रास देत होता. तसेच फिर्यादी महिलेच्या पाच वर्षाच्या मुलासमोरच अनेक वेळा पीडित महिलेशी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं महिलेनं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान 2015 मध्ये मुंबईतील घरी पीडित महिलेवर आरोपी पतीने सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी देखील झाडली. त्यामध्ये पीडित महिला जखमी झाली होती. त्यानंतरही त्यांनी याबद्दल वाच्यता केली नाही. आरोपी पतीकडून होत असलेले अत्याचार थांबत नसल्याने आज पीडित महिलेने आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं खडकी पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT