पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबार; दोघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटनांची मालिकाच गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची प्रचिती आली. मुख्य शहरापासुन 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणीकाळभोर परिसरातील उरूळी कांचनमध्ये पुणे-सोलापुर हायवेवर गोळीबाराची घटना घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या गोळीबारामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात संतोष जगताप (वाळू व्यावसायिक) आणि स्वागत खैरे (हल्लेखोर) या दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

उरुळी कांचन येथील हॉटेल सोनईसमोर दौंड येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. यात संतोष जगताप गंभीर जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जखमी झाल्याची माहिती आहे. तर तीन ते चार जण पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. संतोष जगताप यांचा अंगरक्षकही जखमी झाला असून, त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कबड्डीपटूची हत्या : “ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं”

ADVERTISEMENT

संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करीत असताना रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला.

ADVERTISEMENT

पुणे : बापच निघाला नराधम; 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर गंभीर जखमी झाला, तर उर्वरित हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

जखमी संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT