काही गलिच्छ डॉक्टर मंडळीनी पेशाला काळीमा लावला: नाना पाटेकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: ‘कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना. या काळात डॉक्टरांनी चांगलं काम केलेलं आहे. पण यावेळी देखील काही गलिच्छ मंडळीनी या डॉक्टरी पेशाला काळीमा लावला आहे. काहींनी रक्ताचा काळाबाजार देखील केला आहे.’ अशा शब्दात नाम फाउंडेशनचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी डॉक्टरांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

मागील महिन्याभरात राज्यभरात करोना बाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या जात आहे. ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाम फाउंडेशन यांच्यासह अन्य ग्रुप एकत्रित येत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उदघाटन नाम फाउंडेशनचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापुरातील रक्तपेढ्या व्हेंटिलेटरवर, आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

हे वाचलं का?

यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, ‘सध्याचा रक्त साठा लक्षात घेता, आपण सांगली, पुणे या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा महायज्ञ होण्याच्या दृष्टीने, आपण सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. रक्ताची गरज लक्षात घेता अशा प्रकारची रक्तदान शिबीर देशभरातील वेगवेगळ्या येत्या काळात आयोजन केले जाणार आहे. त्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा सुरू आहे.’ असंही नाना पाटेकर यांनी सांगितले.

तसेच ते पुढे असंही म्हणाले की, ‘आजच्या तरुण पिढीला काही सांगितले. तर ते लगेच ऐकतात, पण दुसर्‍या बाजूला काही मंडळी त्यांना दूषणं देतात. त्यांना काही कळत नाही. त्यांना वाटतं की ते कसंही वागतात. पण माझं मात्र याच्या अगदी विरुध्द मत आहे. खरं तर आजची तरुण पिढी खूपच सजग आहे. आजच्या एवढी तरुण पिढी कधीही सजग नव्हती. आज या सगळ्या धबडग्यात आणि जीवघेण्या स्पर्धेत त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्यांना दोष देता कामा नये.’ अशी भावना देखील नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

लसीकरणाला जाण्यापूर्वी ब्लड टेस्ट करावी का?

ADVERTISEMENT

दरम्यान, मागील काही दिवसात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याचनिमित्ताने पुण्यात रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यातच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम जाणवत आहे. अशावेळी आता स्वत: नाना पाटेकर यांनी रक्तदान शिबिरांसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, राज्यातील आरोग्यसंदर्भातील परिस्थिती लक्षात घेता तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT